लिपिक दांपत्याची 22 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

औरंगाबाद - प्लॉटचे पैसे घेतल्यानंतर घर बांधून देण्याचे आमिष दाखवत लिपिक दांपत्याला 22 लाखांचा गंडा घातला. पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यानंतर खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची व संपवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी नंदकिशोर साहेबराव ढोले (रा. सोनई, ता. नेवासा) याला शनिवारी (ता. नऊ) सिडको, एन-दोन भागातून अटक केली. 

गारखेडा परिसरातील सुशीला राजेंद्र ठुबे (36, रा. अजिंक्‍यनगर, हिंदुराष्ट्र चौक) व त्यांचे पती राजेंद्र असे दोघेही वेगवेगळ्या शाळांत लिपिक आहेत. 2010 मध्ये राजेंद्र यांच्या मामाच्या गावी त्यांची ढोलेंशी ओळख झाली होती. त्यावरून ठुबे दांपत्याने सोनई येथील प्लॉट पाहिला. तो पसंत पडल्यानंतर 17 लाखांत त्याचा ढोलेंशी सौदा करण्यात आला. इसारापोटी ठुबे दांपत्याने त्याला 13 लाख रुपये दिले; तर उर्वरित चार लाख रुपये रजिस्ट्रीवेळी देण्या-घेण्याचे ठरले. इसारपावतीनंतर ठुबेंनी त्याच्याकडे वेळोवेळी रजिस्ट्रीसाठी तगादा सुरू केला; पण त्याने नेहमी टाळाटाळ सुरू केली. तेव्हा विश्वास नसेल तर चेक देतो म्हणत त्याने दहा लाखांचा चेक 19 सप्टेंबर 2016 ला दिला. 

यानंतर ठुबेंनी पुन्हा तगादा सुरू केल्याने त्याने प्लॉटवर घर बांधून देतो; पण त्यासाठी इसारपावतीपोटी उरलेले चार लाख आणि घर बांधकामासाठी पाच लाख असे नऊ लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. ठुबेंनी त्याला नऊ लाख रुपये दिले. हे पैसे मिळाल्यानंतरही त्याने प्लॉटवर घराचे बांधकाम केले नाही. या प्रकारानंतर शुक्रवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ढोले व त्याचे वडील साहेबराव ढोले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Web Title: fraud case in aurangabad

टॅग्स