बनावट संकेतस्थळावरून तरुणाची फसवणूक

बनावट संकेतस्थळावरून तरुणाची फसवणूक

लातूर : जिओ कंपनीचा टॉवर उभारा. त्या मोबदल्यात आम्ही लगेचच तुम्हाला पंधरा लाख रुपयांचा धनादेश देऊ. याशिवाय, पुढच्या पंधरा वर्षांसाठी दरमहा 35 हजार रुपये दिले जातील. असे भरघोस पैशांचे अमिष दाखवून एका तरुणाची एक लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जिओ कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ही फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी धनराज भूतडा (वय 30, रा. कापडगल्ली) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी (ता. 19) तक्रार दाखल केली आहे. भूतडा यांना जिओ कंपनीचा टॉवर उभारण्यासंदर्भातील जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत नमूद असलेल्या जीओ टॉवर डॉट ओआरजी डॉट इन या संकेतस्थळाला त्यांनी भेट दिली. त्यावरील जीओ कंपनीचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो), आजवरची कामे पाहून भूतडा यांनी टॉवर उभारण्यासंदर्भातील अर्ज भरला. त्यानंतर भूतडा यांना कोलकत्यातून दूरध्वनी यायला सुरवात झाली.

सुरवातीला व्हॉट्‌सअॅप वरून ओळखपत्र मागण्यात आले. त्यानंतर 14 हजार 300 रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासाठी बँक खाते क्रमांक देण्यात आले. त्या खात्यावर पैसे भरल्यानंतर 52 हजार 500 रूपये मागण्यात आले. त्यानंतर पून्हा 32 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. पाच दिवसांत सुमारे एक लाख रुपये भूतडा यांनी ऑनलाईन पद्धतीने भरले. मात्र, पैसे भरूनही संबंधीत कंपनीचे अधिकारी, कर्मचारी टॉवर उभाण्यासाठी आले नाहीत. म्हणून भूतडा यांना संबंधीत कंपनीवर संशय आला. त्यांनी जीओच्या अधिकृत शो-रूममध्ये जाऊन संकेतस्थळाची विचारपूस केली. तेव्हा त्यांना हे संकेतस्थळच बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. झालेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी कालिदास मोनल (रा. कोलकत्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com