esakal | भ्रष्टाचार! माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news
  • पाच कोटीचे भ्रष्टाचार प्रकरण
  • मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टीसह लेखापालही ताब्यात

भ्रष्टाचार! माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : नगर पालिकेतील पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी तीन मुख्याधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना बुधवारी (ता. चार) पुणे येथून अटक करण्यात आली.

मुख्याधिकारी आणि लेखापालाच्या जबाबावरून नगर पालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना सहआरोपी म्हणून आज स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

माजलगाव नगर परिषदेला १४व्या वित्त आयोगासह विविध विकास कामासाठी आलेल्या निधीतून जवळपास पाच कोटी ५७ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार एका नगरसेवकाने केल्याने चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

या समितीने दिलेल्या अहवालावरून डिसेंबर २०१९ मध्ये प्रथम एक कोटी ४४ लाख रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्याधिकारी बी. सी. गावीत यांच्यासह तीन तिघा जणांवर तर, आठ दिवसानंतर पुन्हा चार कोटी १३ लाख रुपयाच्या भ्रष्टाचारप्रकरणी बी.सी. गावीत, हरीकल्याण एल्गट्टी, लक्ष्मण राठोड या तीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल अशोक रांजवन, अशोक कुलकर्णी, आनंद हजारे, सुर्यकांत सूर्यवंशी सात जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

शहरात खळबळ, ठाण्याबाहेर गर्दी

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना पोलिसांनी अटक केल्याची बातमी शहरात पसरल्यानंतर शहरात एकाच खळबळ उडाली आहे. त्यांना शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ठेवण्यात आल्याने बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यातील मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना अटक करून जमीन मंजूर झाला होता; परंतु इतर संशयित आरोपी फरार होते. यातील मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.चार) पुणे येथून अटक केली. यातील श्री.एल्गट्टी यांनी दिलेल्या जबाबावरून नगर परिषदेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांन आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ११ वाजता नगर परिषदेतून ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले.

तनवाणींनी काय दिलं भाजपला

यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहाल चाऊस यांना अटक केली असून सायंकाळपर्यंत न्यायालयासमोर हजार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image