Beed Fraud Crime : मृत व्यक्तीच्या खात्यातून ५० हडपले! बीड अर्बन मल्टिस्टेटच्या अध्यक्ष सचिवांवर आरोप
Beed News : बीड अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीत एका मृत व्यक्तीच्या खात्यातून बनावट संयुक्त खाते दाखवून ५० लाख रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. डॉ. रामगोपाल चितलांगे यांचा मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना न सांगता ही फसवणूक करण्यात आली.
बीड : मृत व्यक्तीच्या खात्यातले ५० लाख रुपये परस्पर काढून घेत अपहार केल्याची घटना शहरातील सहयोगनगर भागातील बीड अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीत समोर आली आहे. बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.