पाणी पुरवठा योजनेत 75 लाखाचा अपहार; न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

ग्रामपंचायत कार्यालय कासराळी (ता. बिलोली) या गावासाठी सन २००९ मध्ये भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून ७४ लाख ९४ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला. परंतु आलेल्या निधीचा फायदा वरील कामासाठी केला गेला नाही.

नांदेड : बिलोली तालुक्यातील कासराळी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी आलेल्या शासनाचा ७५ लाखाचा निधी परस्पर हडप केला. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून दोघांवर तब्बल नऊ वर्षांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत कार्यालय कासराळी (ता. बिलोली) या गावासाठी सन २००९ मध्ये भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून ७४ लाख ९४ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला. परंतु आलेल्या निधीचा फायदा वरील कामासाठी केला गेला नाही. प्रत्यक्षात काम झाल्याचे बनावट दस्वेज व स्वाक्षरी करून तत्कालीन पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष अरविंद लक्ष्मण ठक्करवाड आणि उपसरंपच शेषराव बाबाराव लंके यांनी पाणी पुरवठाचे काम झाल्याचे भासवून व अन्य कामे निकृष्ट दर्जाची करून वरील रक्कम परस्पर आपल्या फायद्यासाठी काढून घेतली. याबाबत गावातील एक सुज्ज्ञ नागरीक संग्राम हयगले यांनी त्यावेळेस बिलोली पोलिस ठाण्यात संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करून तक्रार दिली होती. परंतु आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नाही. अखेर तक्रारदार यांनी न्यायालयात दाद मागितली. सर्व प्रकरणाचे पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले. शेवटी नऊ वर्षांनी या प्रकरणात बिलोली न्यायालयाने ही गंभीर असल्याचे नोंदवून वरील दोन्ही आरोपींवर फसवणूकीसह अादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक भगवान धबडगे हे करीत आहेत. 
 

Web Title: fraud in seventy five lakhs of water supply schemes in nanded