हिंगोलीचे भूमीपुत्र देताहेत मोफत आरोग्य सेवा

Hingoli doctor team
Hingoli doctor team
Updated on

हिंगोली : कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प येथील डॉ. अखिलेश अग्रवाल व डॉ. शरयू सतीश देशमुख यांनी केला असून ते दररोज पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची तपासणी करत आहेत. त्‍यांना उद्योजक जगजीत खुराणा यांनी मेडीकल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या मोफत सेवेचे हिंगोलीकरांतून स्वागत केले जात आहे.

हिंगोलीचे रहिवासी व सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले डॉ. अखिलेश अग्रवाल हे लॉकडॉउमुळे हिंगोली शहरात अडकले आहेत. त्यामुळे लॉकडाउन काळात कोरोनाशी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प त्यांनी केला. 

त्‍यासाठी त्‍यांना स्‍व. ब्रिजलाल खुराणा यांच्या स्‍मरणार्थ उद्योजक जगजीत खुराणा यांनी मेडीकल व्हॅन उपलब्ध करून दिली. त्‍यानंतर डॉ. अग्रवाल यांनी पोलिस कर्मचारी, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी सुरू केली. लॉकडाउन संपेपर्यंत मोफत आरोग्य सेवा करणार असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

डॉ. शरयू देशमुख यांचीही मोफत सेवा 

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सहकार्य करीत आहेत. शहरातील डॉ. शरयू देशमुख यांनीही शहरात मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. जागोजागी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची ते एका व्हॅनमधून मोफत आरोग्य तपासणी करीत आहेत.

डीवाय पाटील महविद्यालयात शिक्षण

डॉ. शरयू देशमुख या हिगोली शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी पुणे येथे डीवाय पाटील महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवा तत्‍पर आहे. शासकीय व खासगी डॉक्‍टरदेखील कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. डॉ. शरयू देशमुख यांनीदेखील मूळ गावी हिंगोलीत मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. 

मोफत वैद्यकीय सेवा करण्याची परवानगी

त्‍याप्रमाणे त्‍यांनी हिगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील याच्याकडे अर्ज करून हिगोली शहरात मोफत वैद्यकीय सेवा करण्याची इच्‍छा व्यक्‍त केली. त्‍यानंतर मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी त्यांना परवानगी दिली. डॉ. शरयू देशमुख काही दिवसांपासून शहरात व्हॅन घेऊन पोलिस कर्मचारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करीत आहेत. 

कोराना वारिअर्स

डॉ. आखिलेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरयू देशमुख, डॉ. सुमित झंवर, डॉ. मयुर अग्रवाल तसेच स्व. ब्रिजलाल खुराणा यांच्या स्मरणार्थ कोराना वारिअर्स यांच्या मार्फत दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Search for Missing Toddler Ends in Tragedy; Village Grieves Four-Year-Old's Death
Marathi News Esakal
www.esakal.com