फुकट दूध वाटप आंदोलनाचा बिगुल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद - प्रशासन व शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुधाला शासनाने जाहीर केलेला हमी दर मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून अहिंसक मार्गाने दूध मोफत वाटप आंदोलन सुरू केले आहे. शासनाने या भजन कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली. सरकारने उत्तम दर्जाच्या दुधाला 27 प्रतिलिटर हमी दर निश्‍चित केले असले तरी, प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते दर दूध घालत असलेल्या डेअरी वा संघाकडून मिळत नाहीत.

औरंगाबाद - प्रशासन व शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुधाला शासनाने जाहीर केलेला हमी दर मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून अहिंसक मार्गाने दूध मोफत वाटप आंदोलन सुरू केले आहे. शासनाने या भजन कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली. सरकारने उत्तम दर्जाच्या दुधाला 27 प्रतिलिटर हमी दर निश्‍चित केले असले तरी, प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते दर दूध घालत असलेल्या डेअरी वा संघाकडून मिळत नाहीत. केवळ 16 ते 21 रुपयांवर त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे दूध उत्पादक संकटात सापडला आहे, असे आंदोलकांनी सांगितले. हे आंदोलन नऊ मेपर्यंत चालणार आहे. 

Web Title: Free milk allocation movement