esakal | लातुरात ग्रामपंचायतीच्या वादातून दोन गटात फ्रिस्टाईल मारामारी
sakal

बोलून बातमी शोधा

crime news in latur

लातुरात ग्रामपंचायतीच्या वादातून दोन गटात फ्रिस्टाईल मारामारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर (लातूर): तालुक्यातील मौजे चिलखा येथे गावातील दोन गटात दगडफेक होऊन जखमी झाल्याची घटना घडली आहे (crime news) . यामधे जवळपास पंधरा व्यक्ती जखमी झाले आहेत. ही घटना म्हणजे ग्रामपंचायतींची धग नव्याने निघाल्याचे चित्र असल्याचे गावकऱ्यांची चर्चा आहे. देगलूर (deglur) तालुक्यातील मष्णेर देवस्थान संदर्भात दरवर्षी मे महिन्यात अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

गावातील काही नागरिकांच्या घरी पूजाअर्चा करून संबधितांना बोलवून जेवण दिले जाते. या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार (ता. ४) रोजी करण्यात आले, दरम्यान दुपारी शिंदे व माने यांच्या कुटुंबात वादावादी झाली. या वेळी उपस्थितांच्या मदतीने हा वाद मिटवला. संध्याकाळी दुपारच्या कारणाची नव्याने ठिणगी पडल्याने दोन्ही गटाकडून (clash between two groups) गावातील पाण्याच्या टाकी परिसरात दगडफेक करण्यात आली.

हेही वाचा: अक्षरशः कोरोनाला लोळवलं! वय ९८, स्कोअर १८ अन् ऑक्सिजन ७० होता तरीही जगण्याची जिद्द होती...

या दगडफेकीत जवळपास २० नागरीक जखमी झाले असून या संदर्भात परस्पर विरोधी गुन्हा नोंद झाला आहे. एका गटातील १० तर दुसऱ्या गटातील २१ असे एकूण दोन्ही गटातील ३१ जणांवर गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी एका गटातील ७ तर दुसऱ्या गटातील ६ अशा एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: उमरग्यात संचारबंदीचे आदेश धुडकावणारे दहा दुकाने सील

अशी झाली होती निवडणूक-

चिलखा ग्रामपंचायत सात सदस्यांची आहे. फेब्रुवारी २०२१ सालातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत सुभाष होळकर आणि वनिता शिंदे यांच्या गटाचे चार उमेदवार निवडून आले होते. परंतु याच गटातील माजी सरपंच असलेल्या एका महिला सदस्यांनी आपल्याच गटाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे अधिक सदस्य निवडून आलेल्या गटाच्या विरोधात निकाल जाऊन सरपंचपदी संतोष होळकर तर उपसरपंचपदी सुमनबाई अंबादास शिंदे यांची निवड झाली होती.

हेही वाचा: धक्कादायक! उस्मानाबादमध्ये आढळला जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह

गावातील तणावाच्या अनुशंगाने ४ मे रोजी रात्री पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या चिलखा येथे शांतता असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

- नानासाहेब लाकाळ, पोलिस निरीक्षक.


loading image