esakal | उमरग्यात संचारबंदीचे आदेश धुडकावणारे दहा दुकाने सील
sakal

बोलून बातमी शोधा

umarga police action

उमरग्यात संचारबंदीचे आदेश धुडकावणारे दहा दुकाने सील

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाची (corona infection) साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील (emergency service) दुकानांच्या वेळेत कापड दुकानांसह इतर दुकानात बंद शटरआड सुरू असलेल्या व्यवहाराचा बुधवारी (ता.पाच) उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी पर्दापाश केला. दरम्यान उमरगा शहर (umarga) व तालुक्यात कोरोना संसर्गाची लाट सुरू आहे. रूग्ण संख्या आणि मृत्युचे प्रमाण वाढत आहे (increasing death rate). अशा स्थितीत प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या काळात दुकानदारांची मक्तेदारी आणि नागरिकांच्या बेफिकीरीकडे पोलिस, पालिकेचे दुर्लक्ष होत होते. अखेर बुधवारचा मुहुर्त मोठ्या कारवाईसाठी यशस्वी ठरला.

उमरगा शहर व तालुक्यात २०२१ या वर्षात कोरोना संसर्गाचा वेग चौपटीने वाढला आहे. फेब्रुवारी, मार्चनंतर एप्रिल महिन्यात बाधितांची संख्या सतराशेपेक्षा अधिक झाली आहे. प्रशासनाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन (lockdown), संचारबंदी (curfew) लागू केली परंतु बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नव्हते. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला सकाळी सात ते अकरापर्यंत सुरु असताना बाजारपेठेतील कापड व्यापारी, सराफ व्यापारी, जनरल स्टोअर्सचे दुकाने छुप्या पद्धतीने सुरु ठेवण्यात येत होती.

हेही वाचा: मराठा आरक्षण : आजचा निकाल हे केंद्र व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचं पाप !

बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास वऱ्हाडे, अभियंता डी.पी. राऊत, करबस शिरगुरे, शेषेराव भोसले, किरण क्षीरसागर, सलीम सास्तुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने बाजारपेठेत धडक कारवाईला सुरूवात केली. त्यात शामकुमार द्वारकादास कापड दुकान, स्वागत कलेक्शन, लाईफ स्टाईल, गुडलक जनरल स्टोअर्स, सिद्धी इलेक्ट्रीकल्स यासह दहा दुकाने पालिकेने सिल केले असून दुपारपर्यंत चार दुकानदाराकडून प्रत्येकी दहा हजाराचा दंड वसुल झाला होता.

हेही वाचा: कर्जास कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

उशीराची पण मोठी कारवाई !

पालिका, महसूल व पोलिस विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने दुकानदारांना जणू मूभा मिळत होती. बाजारपेठेत कांही व्यापारी तर ग्राहकांना बोलावून घेत असल्याचे चित्र होते, हे चित्र प्रशासनाला इतके दिवस दिसले नाही का ? पण उशीरा का होईना प्रशासनाने मोठी कारवाई केली त्यात यापुढेही सातत्य राहिले तर बाजारपेठेत गर्दी दिसणार नाही.

loading image
go to top