पिलामुळे झाली वानरांसोबत दोस्ती 

केदारखेडा : वानरांसोबत वालसा येथील माजी सरपंच गंगाबापू जाधव.
केदारखेडा : वानरांसोबत वालसा येथील माजी सरपंच गंगाबापू जाधव.
Updated on: 

केदारखेडा (जि.जालना) - मंदिरात दर्शनासाठी जाताना जवळ आलेल्या वानराच्या एका पिलाला गंगाबापूंनी एक बिस्कीट खायला दिले. त्यानंतर या पिलाने अख्खा गोतावळाच सोबत आणायला सुरवात केली. आज गंगाबापूंची एकदोन नव्हे तर चक्क जवळपास वीस वानरांसोबत दोस्ती झाली आहे. 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथील माजी सरपंच गंगाबापू जाधव हे तीन महिन्यांपूर्वी मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी झाडावरील वानराचे एक पिल्लू खाली येऊन त्यांच्याजवळ आले. असे दोन-तीनवेळा झाले. 

गंगाबापूंनी एक बिस्कीटपुडा आणून त्यातील बिस्कीट पिल्लू वानराला दिले. त्यानंतर गंगाबापूंच्या शेजारी येऊन बसायचे आणि बिस्कीट, भाकरी असा खाऊ घ्यायचा दिनक्रम सुरू झाला. विशेष म्हणजे या पिलाने सोबत गोतावळा आणण्यास सुरवात केली. मग गंगाबापू पारावर बसले की एकदोन नव्हेतर पंधरा ते वीस वानर भोवती बसू लागले.

मग गंगाबापूही सोबत बिस्कीट, केळी, पोळ्या, भाकरी असा खाऊ आणू लागले. त्यामुळे त्यांची आणि वानरांची चांगलीच दोस्ती झाली आहे. विशेष म्हणजे गंगाबापू आले की झाडावरून उड्या मारत वानरे त्यांच्याजवळ येतात. खाऊ खाल्ल्यानंतर त्यांच्या अंगाखांद्यावर खेळतात. हा दिनक्रम नित्याचाच होऊन बसला आहे. 

तीनेक महिन्यांपूर्वी माकडाचे एक पिल्लू जवळ आले. त्याला बिस्कीट दिले. त्‍यानंतर ते दररोजच येऊ लागले. पुढे त्याच्यासोबत अनेक वानरही आले. आता मी पारावर आलो की सारे येतात. चला रे म्हणालो, की खाली येऊन बसतात. कोणावरही धावत नाही हे विशेष. 
- गंगाबापू जाधव, 
वालसा खालसा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

CMC Fodder Cultivation Project for Drought Affected Farmer
Medicine
First water rotation released from Jayakwadi dam for Rabi season.
Doctors Save Accident Victim