गेवराई - तालुक्यातील सेलू येथील अल्पधारभूधारक शेतकरी कुटुंबातील शिवराज अशोक शिंगाडे याने रोज दहा तास अभ्यास करून सीएमए पदाला गवसणी घातली आहे. सेलू येथील ग्रामस्थांकडून त्याचे स्वागत होत आहे.
गोदावरी व सिंदफणा नदीच्या मध्यंतरी ओसलेला गेवराई तालुक्यातील शेतशिवार हिरवं झाले. त्यातच जायकवडीच्या उजव्या कालव्याने गेवराईच्या तीन जिल्हा परिषद सर्कल मधील शेतशिवार सिंचनात आले. ८०-९० च्या शतकात कोरडवाहू असलेल्या सेलू गावातील शेतशिवार जवळपास ७५ टक्के ओलीताखाली आले.
यामुळे येथील शेतकरी नगदी पिकाकडे वळला तर याच गावातील अशोक शिंगाडे या शेतक-याला तीन एकर शेतजमीन असल्याने मुलाचे शिक्षण व्हावे यासाठी सदरील शेतकरी भाजीपाला लागवड करून यातून त्याने मुलगा शिवराज याचे संपूर्ण शिक्षण केले. वडिलांच्या कष्टाचे चीज पहाता शिवराज याने रोज दहा तास आभ्यासात जीव ओतून सीएमए पदाला गवसणी घातली.
शिवराज शिंगाडे याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण जातेगावच्या यमादेवी विद्यालयात तर उच्च माध्यमिक शिक्षण केएसके कनिष्ठ महाविद्यालय येथे तर पदवीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात येथे पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे येथे सीएमए (कॉस्ट मॅनेजमेंट औंकाटट) याचे शिक्षण घेतल्याने यात तो पात्र ठरला असून, ग्रामीण एका अल्पधारभूधारक व भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा हा सीएमए बनला असल्याने त्याच्या यशाचे सेलू गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.