रस्त्यांसाठी 150 कोटींच्या निधीला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

औरंगाबाद - शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव मंगळवारी (ता. सात) महापौर भगवान घडामोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. यावर वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या काही दिवसांत दोन टप्प्यांत 150 कोटी रुपयांचा निधी देण्यासाठीची मान्यता दिली आहे. यामुळे शहरातील 25 रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

काही महिन्यांपूर्वी शहरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत महापालिका प्रशासनाने शहरातील 40 रस्त्यांच्या कामांसाठी 261 कोटी रुपयांची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. नुकत्याच औरंगाबाद दौऱ्यात वित्तमंत्र्यांनी 150 कोटींतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा प्रस्ताव देण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना केल्या होत्या. मंगळवारी (ता. सात) महापौर भगवान घडमोडे यांनी मुंबईत वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडे 150 कोटींतून करण्यात येणाऱ्या प्रस्तावित 25 रस्त्यांच्या यादीचा प्रस्ताव दिला. या वेळी महापौरांसोबत आमदार अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, प्रशांत देसरडा आदींची उपस्थिती होती. शिष्टमंडळाने वित्तमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केल्यानंतर वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी 150 कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली असून, हा निधी दोन टप्प्यांत वितरित करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे महापौर भगवान घडामोडे यांनी सांगितले.

"डीपीआर'साठी निविदा
महापौर भगवान घडामोडे यांनी सांगितले, की 150 कोटींतून करण्यात येणाऱ्या प्रस्तावित रस्त्यांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी "पीएमसी'ची नियुक्‍ती करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही पीएमसी निविदापूर्व आणि निविदा प्रक्रियेनंतरचेही काम पाहील. गुरुवारपर्यंत (ता. 23) ही प्रक्रिया पूर्ण होईल.

Web Title: fund sanction for road