जी-पॅट परीक्षेबाबत संभ्रमावस्था; परीक्षा केंद्रांबाबतही गोंधळ

ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट नऊ एप्रिलला प्रवेशपत्रे चार एप्रिलपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केले
G-PAT exam Admissions announced by National Testing Agency
G-PAT exam Admissions announced by National Testing Agency sakal

परभणी : ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) नऊ एप्रिलला होईल आणि प्रवेशपत्रे चार एप्रिलपासून देण्यात येतील असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केले होते. मंगळवारपर्यंतही प्रवेशपत्रे अथवा अन्य कुठलीही माहिती न मिळाल्याने परीक्षार्थी संभ्रमात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून फार्मसीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जीपॅट ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेतील गोंधळाच्या स्थितीमुळे एजन्सीच्या कार्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी ‘एनटीए’ने आपल्या संकेतस्थळावर आगावू सूचना म्हणून विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शहरांची नावे प्रसिद्ध केली.

प्रवेशपत्रसदृश या प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्रांच्या शहरांची नावे पाहून परीक्षार्थी हादरून गेले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीत पसंतीच्या व सोयीच्या तीन शहरांची नावे दिली होती. त्यापैकी एकही शहर परीक्षा केंद्र म्हणून न येता वेगळेच व गैरसोयीच्या शहराचे नाव परीक्षेचे केंद्र म्हणून दिल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. अनेक विद्यार्थी, पालकांनी ‘एनटीए’च्या हेल्पडेस्कशी संपर्क साधला. तेथेही तक्रारींची दखल न घेता, त्यांना ईमेल करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मराठवाड्यातीलच शेकडो विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’ला ईमेल केलेले आहेत. परंतु त्याची तरी दखल ‘एनटीए’ने घेतली की नाही, याबाबत काही माहिती मिळत नाही. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे. किमान परीक्षेच्या प्रवेशपत्रावर दिलेल्या तीनपैकी एका शहरात परीक्षा केंद्र मिळेल या आशेने हे विद्यार्थी चार एप्रिलला मिळणाऱ्या प्रवेशपत्रांची वाट पाहत होते. परंतु आजही (ता.पाच)''एनटीए’ने संकेतस्थळावर प्रवेशपत्रे अपलोड न केल्यामुळे विद्यार्थी वैतागून गेले आहेत.

परीक्षेच्या तारखेत बदल होणार का?

‘एनटीए’च्या संकेतस्थळावर आजही जीपॅट परीक्षेची तारीख नऊ एप्रिलच आहे; परंतु पाच एप्रिलपर्यंतही प्रवेशपत्रे मिळाली नसल्याने परीक्षेच्या तारखेत बदल होणार का, याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील या संस्थेतही सावळा गोंधळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com