नांदेड : पोटासाठी आख्खे कुटुंब रस्त्यावर 

प्रमोद चौधरी 
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

दिवाळी सणालाच अख्खं कुटुंब पोटाची खलगी भरण्यासाठी रस्त्यावर येते, यावर विश्वास बसत नाही ना....पण ते खरे आहे. नांदेडमधील अठराविश्व दारिद्र्य असलेल्या गायकवाड कौटुंबियांची ही ह्रदय हेलावून टाकणारी व्यथा.

नांदेड : आज वसुबारसने दिवाळी सणाला सुरुवात झाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण. नविन कपडे खरेदीची लगबग, दिवाळी फराळाची घरोघर सुरू असलेली जय्यत तयारी... एकंदरीतच सगळीकडे आनंदोत्सव...

परंतु दिवाळी सणालाच अख्खं कुटुंब पोटाची खलगी भरण्यासाठी रस्त्यावर येते, यावर विश्वास बसत नाही ना....पण ते खरे आहे. नांदेडमधील अठराविश्व दारिद्र्य असलेल्या गायकवाड कौटुंबियांची ही ह्रदय हेलावून टाकणारी व्यथा.

या कुटुंबात चार लहान मुलं आहेत.  हे दांपत्य तीन मुलिंना तीनचाकी सायकलवर बसुन, तसेच तान्हुल्याला झोलित टाकुन रोज सकाळी पाच वाजता राजकॉर्नर येथे येऊन प्लास्टिक वेचून आपली उपजीविका भागवितात. रिक्षाला झोळीत बांधलेले एक वर्षाचे बाळ व रिक्षात बसली तीन छोटी चिमुकली मुले यांची अवस्था पाहून मन सुन्न होतं. अशा लोकांची दिवाळी कशी होणार? या मुलांनाचे शिक्षणाचे काय? असे असंख्य प्रश्न यावरून उपस्थित होतात.

Web Title: gaikwad family diwali on road in Nanded

टॅग्स