50 लाख जाणार गाळात, गणेश विसर्जन विहिरींच्या साफसफाईसाठी होणार खर्च

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

गणेशोत्सव जवळ येत असून, महापालिका प्रशासनाने विसर्जन विहिरींची सफाई, विसर्जन विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पॅचवर्कची तयारी सुरू केली आहे.
अंदाजपत्रके तयार करण्यात आली असली तरी सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निविदा प्रक्रियेला विलंब लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाराचा वापर करून ही कामे करावीत, अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत. या कामासाठी तब्बल 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

औरंगाबाद - गणेशोत्सव जवळ येत असून, महापालिका प्रशासनाने विसर्जन विहिरींची सफाई, विसर्जन विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पॅचवर्कची तयारी सुरू केली आहे.
अंदाजपत्रके तयार करण्यात आली असली तरी सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निविदा प्रक्रियेला विलंब लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाराचा वापर करून ही कामे करावीत, अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत. या कामासाठी तब्बल 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

गणेत्सवानिमित्त महापालिकेतर्फे दरवर्षी विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे, विसर्जन विहिरींची सफाई करण्याची कामे हाती घेतली जातात. शहरात सुमारे 20 विसर्जन विहिरी आहेत. त्यांची सफाई करण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. गणेशोत्सव महिनाभरावर आला आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही कामे आयुक्तांनी तातडीच्या कामांसाठी असलेले अधिकार वापरून करावीत, अशा सूचना केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी अत्यावश्‍यक ड्रेनेज दुरुस्ती, मुरूम टाकणे, अशी कामे करण्यासाठी वॉर्ड अभियंत्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी ऍडव्हान्स स्वरूपात देण्यात यावा, अशा सूचनाही महापौरांनी केल्या आहेत. 

प्रत्येक विहिरीला साडेतीन लाख 
विजर्सन विहिरींची सफाई करण्यासाठी अंदाजे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीतील गाळ काढण्याच्या कामासाठी साडेसात लाख रुपये व विहिरींसाठी प्रत्येकी साडेतीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh visarjana's wells