नांदेड जिल्ह्यात सोळा वर्षीय बालिकेवर सामुहीक बलात्कार

नांदेड जिल्ह्यात सोळा वर्षीय बालिकेवर सामुहीक बलात्कार

नांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात आईच्या गळ्यावर चाकु ठेवून तीन नराधमानी सोळा वर्षीय बालिकेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची किळसवाणी घटना संविधान दिनी (ता.26) घडली. पोलिसांनी तिन्ही नराधमांना गजाआड केले आहे.

उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागातील एका घरात गोरठा (ता. उमरी) येथील नराधम आनंदा महादू सावंत आणि त्याचे मित्र कुणाल आणि शुभम या तिघांनी संगनमत करून सोमवारी (ता. 26) दुपारी एक वाजता घुसले. यावेळी घरात पिडीत बालिका आणि तिची वृध्द आई काम करीत होती. यावेळी या नराधमानी पीडीत बालिकेच्या आईच्या गळ्यावर चाकू लावला आणि आलीपाळीने पाशवी बलात्कार केला.

हा प्रकार घरात तब्बल चार वाजेपर्यंत सुरू होता. त्यावरून या नराधमांनी हा प्रकार कोणाला सांगितला तर परिवाराला ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत बालिका आणि तिच्या आईने घाबरलेल्या अवस्थेत उमरी पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके यांनी प्रकरणाची गंभिरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पिडीत बालिकेला प्राथमिक रुग्णालयात पाठविले. पिडीत बालिकेच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात सामुहीक बलात्कार, अॅट्रासिटी अॅक्ट व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तीन्ही नराधमांना अटक केली आहे.

सायंकाळी न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिस उपाधिक्षक ए. बी. देशपांडे यांनी सांगितले. उमरी पोलिसांनी मात्र या प्रकरणी गोपनियता पाळली होती. माध्यमांना कुठलीच माहिती सांगण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com