गंगाखेड-परळी महामार्गाचे काम रखडले

प्रवासात अडथळा, चालकांसह प्रवाशांत तीव्र असंतोष
parbhani
parbhani sakal

गंगाखेड : गंगाखेड-परळी या राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग झाला. सिमेंट रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली. परंतु, गुत्तेदाराने रस्ता उकरून ठेवले. त्यानंतर आता काम रखडले आहे. परिणामी, प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला असून, वाहन चालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

गंगाखेड ते परळी या तीस किलोमीटर अंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. परंतु, संबंधित ठेकेदाराने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चार किलोमीटर रस्ता उकरून ठेवला. आता काम बंद केले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळ्यात वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी चिखलामध्ये अनेक वाहन फसत असल्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्यामुळे वाहन चालक व प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहन चालकांसह प्रवाशांतून होत आहे.

अपघाताची शक्यता वाढली

सध्या पावसाळा सुरू आहे. पण, हा रस्ता खोदून ठेवल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. दरम्यान, चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडत असल्याच्या घटनाही घडत आहेत. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर या ठिकाणी मोठा अपघातही होऊ शकतो.

२२४.४४ कोटी रुपये निधी मंजूर

परळी ते गंगाखेड (३६१एफ) या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २२४.४४ कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. वर्षभरापूर्वी खुद्द माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली होती. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने त्याच्या रुंदीकरण व सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पण, संबंधित कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवला. सध्या काम थांबलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com