esakal | गंगाखेडचा ऐतिहासिक दसरा यंदा रद्द; पूजा मात्र नित्यनेमाने सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाने मार्च महिन्यात भारतात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर केंद्र तथा महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासह महाराष्ट्रात टाळेबंदी घोषित केली.

गंगाखेडचा ऐतिहासिक दसरा यंदा रद्द; पूजा मात्र नित्यनेमाने सुरू

sakal_logo
By
प्रा. डाॅ. अंकुश वाघमारे

गंगाखेड (जिल्हा परभणी) : दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव सुद्धा शासनाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आला. परन्तु मंदिरातील पूजा नित्यनेमाने सुरू आहेत.

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाने मार्च महिन्यात भारतात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर केंद्र तथा महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासह महाराष्ट्रात टाळेबंदी घोषित केली.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनातर्फे टाळेबंदीत वेळोवेळी वाढ करण्यात आली. या टाळेबंदी च्या काळात विविध धर्माचे सण- उत्सव आले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यात येऊ नये असा निर्णय घेतला. संपूर्ण भारतात साजरा होणारा दसरा महोत्सव महोत्सवाच्या काळात मंदिरे उघडली जातील असा विश्वास भक्तांना होता. यासाठी काही पक्षांनी आंदोलनेही केली. परंतु शासनाच्या निर्णयानुसार दसरा महोत्सवात देखील मंदिरे बंद राहणार असल्यामुळे भक्तांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव सुद्धा शासनाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आला.

हेही वाचा  परभणी : पिक कर्जासाठी शेतकऱ्याचे बँकेत धरणे आंदोलन 

सकाळी सूर्यवाहन व सायंकाळी चंद्रवाहनातून मिरवणूक काढली जाते

गंगाखेड येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवास सातशे वर्षांचा इतिहास आहे. परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील भक्तगण रथ महोत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात. दसरा महोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात श्री बालाजीच्या मूर्तीची पहिल्या दिवशी धजा वाहनातून, दुसऱ्या दिवशी नाग वाहनातून, तिसऱ्या दिवशी मोर वाहनातून, चौथ्या दिवशी वाघ वाहनातून, पाचव्या दिवशी सकाळी सोंड हाल्या हत्ती व सायंकाळी पालखी तून मिरवणूक काढली जाते, सहाव्या दिवशी अंबारी हत्ती वाहनातून, सातव्या दिवशी सकाळी सूर्यवाहन व सायंकाळी चंद्रवाहनातून मिरवणूक काढली जाते, आठव्या दिवशी मारुती वाहनातून, नवव्या दिवशी गरुड वाहनातून व विजयादशमीच्या दिवशी तीस फुटी उंच असलेल्या ऐतिहासिक लाकडी रथातून व सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान अश्व वाहनातून श्री बालाजीच्या मूर्तीची शहरातील शनी मंदिर, डॉ.आंबेडकर नगर, दिलकश चौक, मोठा मारुती, जनाबाई मंदिर आदी भागातून मिरवणूक काढली जाते.हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मराठवाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात गंगाखेड येथे दाखल होतात. परंतु यावर्षी गंगाखेड शहरातील ऐतिहासिक दसरा महोत्सवास कोरोना महामारी चे ग्रहण लागल्यामुळे गंगाखेड शहरातील ऐतिहासिक दसरा महोत्सवास खंड पडला.यामुळे भाविक भक्तांसह याठिकाणी लहान लहान दुकाने उभा करून पोट भरणाऱ्या व्यवसायिकां मधून नाराजीचा सूर समोर येत आहे.

येथे क्लिक करा - इंग्रजी माध्यमांच्या शाळा आल्या अडचणीत -

भाविक- भक्त श्रींच्या दर्शनास मुकले

शासनाने मंदिरे खुली न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविक- भक्त श्रींच्या दर्शनास मुकले आहेत. श्री बालाजीची प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. श्रींना विविध पोशाख परिधान करून सजविण्यात आले.

-चंद्रकांत खारकर, पुजारी तथा विश्वस्थ, श्री बालाजी देवस्थान, गंगाखेड.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image