Gangapur Traffic Jam : रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडी

शहरातील मुख्य चौकांना हातगाड्या, वाहनांचा विळखा
Gangapur Traffic Jam
Gangapur Traffic Jamsakal

गंगापूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौकासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम झाले. मात्र, तरिही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागताे. यामुळे प्रवाशांसह तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उभी करण्यात येणारी चारचाकी, दुचाकी वाहने आणि हातगाड्यांची अतिक्रमणे यामुळे दिवसेंदिवस येथील वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटिल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर शहरातील मुख्य रस्ता गुळगुळीत करून त्याचे रुंदीकरणही करण्यात आले. मात्र, रस्त्याचे रुंदीकरण होऊनही येथे वाहतुकीची कोंडी कायम आहे. येथील मुख्य बाजारपेठेतील ९० टक्के दुकानांना स्वतःची पार्किंगच नाही.

त्यांची चारचाकी तसेच दुचाकी जागा मिळेल तिथे उभी केली जात आहे. त्यामुले वाहतुकीची समस्या कायम आहे. काही दुकानांनी अतिक्रमणे केल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होताे. त्यामुळे अतिक्रमणे करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

येथील वैजापूर रस्ता पूर्ण झाल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुक्तता होईल, अशी आशा शहरवासीयांना होती. परंतु ही स्थानिकांची अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र आहे. डांबरीकरण पूर्ण होताच बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क करण्यास सुरुवात केली.

सायंकाळी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. यामुळे छोटे-मोठे अपघातही होत आहे. याच गर्दीतून मार्ग काढत प्रवाशांना वाहने चालवावे लागतात. ही समस्या सोडवण्यासाठी बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी प्रवाशांनी केली आहे.

चौकाला फेरा मारताना अडचण

नव्याने झालेला वैजापूर रस्ता अतिशय सुसाट झाला आहे. त्यात मुख्य शिवाजी चौकाला नागरिक फेरा मारत नाही. काही जण विरुद्ध दिशेने जातात. तर अनेक गाड्यांना पूर्ण वळणच घेता येत नसल्याने त्यांना विरुद्ध दिशेनेच जावे लागते. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पालिका, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

गंगापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर उभी राहणारी दुचाकी, चारचाकी वाहने यांच्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई करावी. तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणे करणाऱ्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे पोलिसांसह पालिकेचे अधिकारी मिळून कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अपघात झाल्यास जबाबदार काेण?

गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौकासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले. मात्र, तरिही रोज नागरिकांना येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उभी करण्यात येणारी चारचाकी, दुचाकी वाहने आणि हातगाड्यांची अतिक्रमणे यामुळे दिवसेंदिवस येथील वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटिल होत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे या मार्गावरून अवजड वाहनेही जातात, त्यामुळे माेठा अपघात हाेण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही स्थानिक पाेलिस तसेच पालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने प्रवाशांनी या कारभाराबाबत राेष व्यक्त केला आहे. येथील चाैकात तसेच मुख्य रस्त्यावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार काेण? असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला.

रस्त्याच्या कडेला नागरिकांनी गाड्या पार्किंग करू नये. असे केल्यास पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. पालिका प्रशासनाची देखील याकामी मदत लागणार आहे.

- सत्यजित ताईतवाले, पोलिस निरीक्षक, गंगापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com