Dhangar Reservation : गंगापूरात आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचा रास्ता रोको

सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी मंगळवारी (ता. २९) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Dhangar Society Agitation
Dhangar Society Agitationsakal

गंगापूर - सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी मंगळवारी (ता. २९) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव उपस्थित होते.

मागील आठ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाकडून दखल न घेतल्याने या उपोषण आंदोलनाचे पडसाद आता तालुक्यामध्ये गावोगावी उमटू लागले आहेत. शासनाकडून या आंदोलनाची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा देखील इशारा धनगर समाज बांधवांकडून देण्यात आला.

तसेच घटनेमध्ये असणारे धनगर समाजाचे आरक्षण शासनाने तातडीने लागू करावे अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com