गांजा तस्करांना अटक, 12 लाखाचा गांजा जप्त 

प्रल्हाद कांबळे 
रविवार, 22 जुलै 2018

नांदेड : तेलंगनातून चाळीसगावकडे (खानदेश) चोरीच्या मार्गे एका इनोव्हा कारमधून जाणारा बारा लाखाच्या गांजाचे पाकीट जप्त करण्यात आले. यावेळी दोघांना अटक केली असून ही कारवाई रोडा नाईक तांडा शिवारात शनिवारी (ता. 21) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस व वनविभागाच्या वतीने करण्यात आली. 

तेलंगनातील अदिलाबाद भागातून गांजाची नेहमी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती इस्लापूर पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी या प्रकाराकडे लक्ष केंद्रीत करून शनिवारी (ता. 21) दुपारी रोडा नाईक तांडा या रस्त्यावर नाकाबंदी लावली. यावेळी चारच्या सुमारास इनोव्हा कार भरधाव वेगात येत असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यांनी ही गाडी थांबविली. गाडीची तपासणी केली असता तब्बल 534 किलोग्राम वजनाचे गांजाचे पाकीट आढळले.

जवळपास बारा लाखाचा गांजा व इनोव्हा कार जप्त करून तुषार पिंपळे आणि शेख रियाज शेख पिराज या दोघांना अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर कायंदे यांनी आपले वरिष्ठ पोलिस उपाधिक्षक ए. डी. जहारवाल यांना सांगुन ही कारवाई केली. यावेळी वनविभागाचे प्रकाश शिंदे, किनवटचे नायब तहसिलदार लोखंडे आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही आरोपींविरूध्द इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना किनवट न्यायालयासमोर हजर केले असून त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Ganja smugglers arrested, 12 lakhs of ganja seized