
Ganpati Visarjan 2025
Sakal
उमरगा : "गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात पारंपारिक वाद्याच्या तालावर शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी लाडक्या बप्पाला शनिवारी (ता. सहा) उत्साही वातावरणात निरोप दिला. दरम्यान शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थांची सकाळपासुनच मिरवणूकीत सहभागी होण्याची लगभग सुरू होती. लेझीम, झांज व टिपऱ्या नृत्याचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवत गणरायाचे विसर्जन केले.