शहरात कचऱ्याचे ढीग; तरीही १२८ वा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

औरंगाबाद - देशपातळीवर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद शहराची पत वाढली असून, चक्‍क १२८ वा क्रमांक मिळाला आहे. गतवर्षी शहराचा क्रमांक २९९ वा होता. कचऱ्यामुळे नागरिकांचे गेल्या चार महिन्यांपासून हाल सुरू असताना केंद्र शासनाला शहरात स्वच्छता दिसून आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

शहरात फेब्रुवारी महिन्यापासून अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू असून, त्यातच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे स्वच्छतेची पाहणी करणारे पथक शहरात धडकले होते. या पथकाने दोन दिवस शहरातील स्वच्छतेची अवस्था, कचऱ्याची विल्हेवाट याची पाहणी केली होती. पथकाला जागोजागी रस्त्यावर पडलेला कचराच दिसला. त्यामुळे सर्वेक्षणात शहराचे स्थान खूपच खालावेल, अशी भीती व्यक्‍त होत होती. त्यात शनिवारी (ता. २३) केंद्र शासनाने पहिल्या पाचशे शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी पाहून महानगरपालिकेला धक्‍काच बसला. औरंगाबाद शहराला चक्‍क १२८ वा क्रमांक मिळाला. गतवर्षी या सर्वेक्षणात औरंगाबाद शहर २९९ व्या क्रमांकावर होते.

असे होते गुणांकन 
स्वच्छता सर्वेक्षण हे एकूण चार हजार गुणांचे होते. त्यात चार हजारांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे मोठी चुरस होती. एकूण गुणांपैकी औरंगाबाद शहराला एकूण २,४६४ गुण मिळाले आहेत. कागदोपत्री अहवालासाठी १,४०० गुण, प्रत्यक्ष पाहणीसाठी १,२०० आणि सिटिझन्स फीडबॅकसाठी १,४०० गुण होते.  शहराला प्रत्यक्ष पाहणीत सर्वाधिक म्हणजे ९६९ गुण मिळाले आहेत, तर कागदोपत्री अहवालाला ५६२ आणि सिटिझन्स फीडबॅकला ९३३ गुण प्राप्त झाले आहेत.

Web Title: garbage cleaning