कचऱ्याच्या प्रश्‍नावरून पालकमंत्री भडकले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर तोडगा का निघत नाही? असा प्रश्‍न करताच पालकमंत्री डॉ. दीपक सावंत चांगलेच भडकले. नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर कचरा प्रक्रियेच्या कामाला गती मिळेल, असा नवा दावा त्यांनी शनिवारी (ता. 12) केला. 

शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अडीच महिन्यांनंतरही कायम आहे. जागोजाग रस्त्यावर अद्याप कचऱ्याचे ढीग असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत शनिवारी शहरात आलेल्या पालकमंत्र्यांना पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारला असता ते भडकले. कचरा दररोज तयार होतो, हे लक्षात घ्या. शासनाने मंजूर केलेल्या डीपीआरनुसार सध्या काम सुरू आहे. मी गंभीर नाही, असे म्हणता येणार नाही, यापूर्वी मी कचऱ्याबाबत बैठक घेतली होती. नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामाला गती मिळेल, असा दावा त्यांनी केला. महापालिकेला दोन महिने झाले तरी आयुक्त का मिळत नाही? या प्रश्‍नावर एखाद्या अधिकाऱ्याची बदली केल्यानंतर रुजू होण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो, असे सांगत नियमित आयुक्त केव्हा रुजू होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 

Web Title: garbage issue in aurangabad