कचराकोंडीला खासदार खैरेच जबाबदार - भागवत कराड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

औरंगाबाद - 'पाच महिन्यांपासून शहरात कचराकोंडी आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरल्याने साथ रोगाची भीती निर्माण झाली आहे. खासदार चंद्रकांत खैरे या प्रश्‍नाचे राजकारण करीत असून, कचराकोंडीला तेच जबाबदार आहेत,'' असा आरोप मंगळवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला.

कचराप्रश्‍नी खासदार खैरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर आरोप केला, त्यामुळे भाजप नेत्यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेत खैरे यांच्यावर पलटवार केला. पत्रकार परिषदेत कराड म्हणाले, ""बागडे यांनीच पुढाकार घेत नारेगाव येथील जनतेकडून चार महिन्यांचा अवधी मागितला होता; मात्र त्या कालावधीत खासदार खैरे यांना हा प्रश्‍न सोडविता आला नाही. याप्रश्‍नी सर्वपक्षीयांची एक बैठकही त्यांना घ्यावी वाटली नाही. त्यांच्या राजकारणामुळेच शहराची वाट लागली आहे.''

Web Title: garbage issue chandrakant khaire bhagwat karad