कचरे की जंग हम जीत गये...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - शहरात कचराकोंडी कायम असताना दुसरीकडे अनेक वॉर्ड कचरामुक्त होत आहेत. आता त्यात रोजाबाग या वॉर्डाची भर पडली आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या उपस्थितीत हा वॉर्ड बुधवारी (ता. १९) रात्री कचरामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. या वेळी ‘जीत गये भाई जीत गये, कचरे की जंग जीत गये’ अशा घोषणा देण्यात आल्या.

नगरसेवक मोहन मेघावाले यांनी वॉर्ड कचरामुक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली. ओला व सुका कचरा वेगळा साठविण्याचे आवाहन करीत घंटागाड्यांची व्यवस्था केली. तसेच हॉटेल, दुकानदारांना कचरा रस्त्यावर टाकू नये असे आवाहन करण्यात आले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा वॉर्ड कचरामुक्त वॉर्ड म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वॉर्ड अधिकारी अजमत खान, वॉर्ड अभियंता नितीन गायकवाड, स्वच्छता निरीक्षक बी. जी. पाटील, कडुबा वाघमारे उपस्थित होते.

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती 
वॉर्डातील ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण केले जात आहे. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यात येत असून, त्यासाठी फीडबॅक फाउंडेशनतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जयहिंद गणेश मित्र मंडळातर्फे, ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम राबवून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. ज्योती पांडे यांनी महिलांसाठी होम मिनिस्टरसारख्या विविध स्पर्धा घेतल्या. 

Web Title: garbage Issue Municipal