कचरा प्रक्रियेच्या निविदेचाही कचरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

औरंगाबाद - कचराकोंडीला साडेतीन महिने उलटून गेल्यानंतरही निविदांचा घोळ सुरूच आहे. अल्पमुदतीच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीनएक महिना मुदतीच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. तीन प्रकारच्या कामांसाठी या निविदा असून, पहिल्याच निविदांना प्रतिसाद मिळाला तरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे.

कचराकोंडी सोडविण्यासाठी सरकारने घनकचरा व्यवस्थापनाचा 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करून दोन महिने उलटले आहेत. त्यातील दहा कोटींचा निधी महापालिकेकडे पडून आहे; मात्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या निविदांचा घोळ सुरूच आहे. यंत्र खरेदीसाठी काढलेल्या निविदा ऐनवेळी आयुक्तांनी रद्द केल्या. त्यानंतर मंगळवारी (ता. 19) कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. कचरा संकलन आणि वाहतुकीची निविदा भरण्यासाठी 24 जुलै शेवटची तारीख आहे, तर 28 रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. इतर दोन निविदा उघडण्याची तारीख 27 जुलै आहे. त्यामुळे कंत्राट अंतिम करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी ठेकेदारांना ऑगस्ट उजाडणार आहे.

Web Title: garbage process tender