महापालिकेच्या विरोधात  मंगळवारी ‘गार्बेज वॉक’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे व अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच असून, आता नागरिकांची सहनशीलता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. १५) व्यापारी महासंघासह इतरांनी बैठक घेऊन गार्बेज वॉकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

कचराकोंडीवर महापालिकेला अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही. यामुळे ‘गार्बेज वॉक’ काढून कचऱ्याची एकसष्टी साजरी केली जाणार आहे. औरंगाबाद कनेक्‍ट टीमने यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, आर्किटेक्‍ट संघटनेचे संजय पाठे, दिलीप सारडा, स्वप्नील पारगावकर, दीपक देशपांडे, गोविंद कुलकर्णी, राजेंद्र जोशी, सारंग टाकळकर, अरुण देशपांडे, प्रा. प्रशांत अवसरमल, अण्णासाहेब खंदारे, विशाल बन्सवाल, नूपुर भालेराव, दत्तात्रेय सुभेदार, गीता देशपांडे, अक्षय जैस्वाल, शरद लासूरकर, सचिन दराडे, अजय बोरीकर आदी उपस्थित होते. पैठण गेट येथून स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता वॉकला सुरवात होईल. गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेनमार्गे महापालिका मुख्यालयापर्यंत वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कचरा छायाचित्रांचे चालते प्रदर्शन सादर केले जाईल. महापालिकेला निष्क्रियतेबद्दल जाब विचारण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन औरंगाबाद कनेक्‍ट टीमने केले आहे. 

Web Title: Garbage Walk against municipal corporation on Tuesday