महापालिकेविरोधात नागरिकांचा ‘गार्बेज वॉक’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद - पन्नास दिवस उलटल्यावरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. यामुळे औरंगाबाद कनेक्‍ट टीमच्या नेतृत्वात नागरिकांनी महापालिकेविरोधात ‘गार्बेज वॉक’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता पैठण गेट येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून गार्बेज वॉकला सुरवात होईल. विविध संस्था-संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत रविवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपक्रम घेतले. मात्र महापालिका प्रशासनाने ठोस कृती न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक ठिकाणी तर महापालिकेचे कर्मचारीच कचरा जाळत आहेत. महापालिका प्रशासन आणि बेजबाबदार राजकारणी यांच्या भूमिकेवर रविवारी तापडिया नाट्यमंदिराच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. याविरोधात रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णत: राजकीय पक्ष, संघटनाविरहित अशी नागरी ऐक्‍याची हाक असून नागरिक म्हणून प्रत्येक औरंगाबादकराने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थितांनी केले. रोष व्यक्‍त करण्यासाठी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात येणार आहे. यावेळी कचरा छायाचित्रांचे चालते प्रदर्शन केले जाईल. सोमवारपासून (ता. नऊ) रोज थेट मंत्रालयापर्यंत एसएमएस, ट्‌विटरवरून भावना व्यक्त केल्या जातील.

बैठकीला अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, श्रीकांत उमरीकर, अजय शाह, महेंद्र खानापूरकर, दीपक देशपांडे, संजय पाठे, डॉ. रश्‍मी बोरीकर, सारंग टाकळकर, ॲड. गीता देशपांडे, सुलभा भाले, ज्योती नांदेडकर, सरस्वती जाधव, स्मिता अवचार, मनोरमा शर्मा, सुलभा खंदारे, प्रेषित रुद्रवार, नरेश मेघराजानी, अनंत मोताळे, हरीश जाखेटे, हेमंत अष्टपुत्रे, ॲड. जग्यासी श्रीचंद, अरुण देशपांडे, अक्षय जैस्वाल, अमित जाधव, संजय राखुंडे, अक्षय बाहेती, धीरज पवार, अजय बोरीकर, कचरू वेळंजकर, मोहिंदर बाखरिया, लक्ष्मीनारायण राठी, सुनील आपटे, डॉ. अंजली वरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: garbage walk municipal public