सुरक्षेचा डेमो देतानाच गॅसचा भडका

औरंगाबाद - कलाग्राम येथे भरविण्यात आलेल्या एक्‍स्पो प्रदर्शनात रविवारी स्टॉलला लागलेली आग.
औरंगाबाद - कलाग्राम येथे भरविण्यात आलेल्या एक्‍स्पो प्रदर्शनात रविवारी स्टॉलला लागलेली आग.

औरंगाबाद - इंडस्ट्रियल ॲण्ड इंजिनिअरिंग इंडेक्‍स्पोमध्ये सेफ्टी गॅस डिव्हाईसबाबत सुरक्षेचे प्रात्यक्षिक दाखवितानाच गॅसचा भडका उडाला. ही घटना रविवारी (ता. १८) ‘कलाग्राम’मध्ये घडली. यात दोन स्टॉलचे मोठे नुकसान झाले. तेथे तीनदिवसीय एक्‍स्पोचा आजचा शेवटचा दिवस होता. 

इंडस्ट्रियल ॲण्ड इंजिनिअरिंग इंडेक्‍स्पो सोळा ते अठरा नोव्हेंबदरम्यान कलाग्राम येथे भरविण्यात आला होता. यात भारतातील प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या होत्या. युनिव्हर्सल गॅस सेफ्टी डिव्हाईसच्या स्टॉलमध्ये गॅस सिलिंडर व शेगड्या होत्या. तेथे सेफ्टी गॅस डिव्हाईसचे सायंकाळी चारच्या सुमारास प्रात्यक्षिक दाखविताना आग लागली. पाहता पाहता भडका उडून आगीने मोठा पेट घेतला. त्यामुळे इतर स्टॉलचे प्रतिनिधी आणि प्रदर्शन बघणाऱ्यांची धांदल उडाली. यादरम्यान बाजूच्याही स्टॉलने पेट घेतला. दरम्यान, अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. बंब व जवान येईपर्यंत आग आटोक्‍यात आणली गेली. आगीत दोन्ही स्टॉलचे पूर्णत: नुकसान झाले. तेथील नागरिकांनी सिलिंडर बाजूला करून मोठा अनर्थ टाळला.  

सुरक्षेची हमी, नव्हे कमी!
आपकी सुरक्षा आपके साथ अशी जाहिरात करून युवर सेफ्टी अवर प्रायोरिटी अशी हमी देणाऱ्या प्रदर्शनातील या गॅस सेफ्टी डिव्हाईस स्टॉलमध्येच आग लागल्याने पितळ उघडे पडले. विशेषत: आगीची घटना घडल्यानंतर स्टॉलमधील जबाबदार पळून गेले. सुरक्षेची हमी देणारेच पळून गेल्याने तेथील सारेच अवाक्‌ झाले.

सुरक्षेचे उपाय नव्हते
सूत्रांनी सांगितले की, प्रदर्शन भरविण्यात आलेल्या ठिकाणी आयोजकांकडून सुरक्षेचे सर्वोत्तम उपाय करण्यात आले नव्हते. तत्परतेने तेथील प्रतिनिधी आणि नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान बाळगल्यानेच आग फोफावली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com