(व्हिडिओ पाहा) गॅस सिलेंडरचा ट्रक उलटला, पाऊण तासात चाळीस टाक्‍यांचा स्फोट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

तुळजापूर :  सोलापूर - तुळजापूर महामार्गावरील गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक तामलवाडी (ता. तुळजापूर) जवळ मंगळवारी (ता. 11) सायंकाळी सातच्या सुमारास उलटला. या ट्रकमधील सिलेंडरचे एकामागून एक स्फोट होत आहेत. गेल्या पाऊणतासात जवळपास 40 सिलेंडरचे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सोलापूर - तुळजापूर या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पोलिसांनी या परिसरात हायअलर्ट जारी केला आहे. तामलवाडी गावाजवळ असलेल्या पुलापासून काही अंतरावरच हा ट्रक उलटला आहे. 

तुळजापूर :  सोलापूर - तुळजापूर महामार्गावरील गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक तामलवाडी (ता. तुळजापूर) जवळ मंगळवारी (ता. 11) सायंकाळी सातच्या सुमारास उलटला. या ट्रकमधील सिलेंडरचे एकामागून एक स्फोट होत आहेत. गेल्या पाऊणतासात जवळपास 40 सिलेंडरचे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सोलापूर - तुळजापूर या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पोलिसांनी या परिसरात हायअलर्ट जारी केला आहे. तामलवाडी गावाजवळ असलेल्या पुलापासून काही अंतरावरच हा ट्रक उलटला आहे. 

हेही वाचा- पाण्यातून तो गुंगीचे औषध द्यायचा, मग वारंवार बलात्कार करायचा...बीड जिल्ह्यातील प्रकरण

दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांना बाजूला केले आहे. घटनेची माहिती कळताच सोलापूर अग्निशमन दलाचे पथक रवाना झाले आहे. अग्निशमन दलाचे पथक पोचले तेव्हा गॅस सिलेंडर टाकीचे स्फोट होत होते. गॅस सिलेंडर टाक्‍या घेऊन सोलापूरहून लातूरच्या दिशेने हा ट्रक येत होता. सुरवातीला ट्रकला आग लागली, ही आग वाढत जाऊन ट्रकमधील सिलेंडर टाक्‍यांना आग लागली. यातून सिलेंडर टाक्‍याचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा - महिलेला पेटविल्याच्या प्रकरणातील आरोपीला जेल 

सिल्लोड तालुक्‍यातील अंधारी येथील 50 वर्षीय महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तीन दिवसांनी महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिनंदन ज. पाटंगणकर यांनी दिले. दरम्यान, पीडितेच्या मृत्युनंतर प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 302 समाविष्ट करण्यात आले आहे. 

मृत्युपूर्व फिर्यादीनुसार पन्नासवर्षीय पीडित महिला घरी एकटीच राहत होती. तिच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. दोन फेब्रुवारीला रात्री अकराच्या सुमारास संशयित संतोष मोहिते (वय 50) हा तिच्या घरी आला. "तू रात्री-अपरात्री घरी येऊ नकोस, त्यामुळे माझी बदनामी होते,' असे तिने त्याला सुनावले होते. यावरून भांडण करत संतप्त झालेल्या संतोषने तिला शिवीगाळ, मारहाण करीत रॉकेल ओतून पेटवून दिले होते. त्यानंतर घराची कडी लावून तो पळून गेला होता. फिर्यादीने आरडाओरड केल्यामुळे फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या तिच्या मुलीने व मुलीच्या पतीने आग नियंत्रणात होती.

क्लिक करा- अरविंद गोरे यांच्या पॅनेलची पुन्हा बाजी

त्यानंतर पिडीत महिलेला घाटीत दाखल करण्यात आले होते व फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या 307, 452, 323, 504 कलमान्वये तसेच ऍट्रॉसिटी कायद्यान्वये सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला4 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली व त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, उपचार सुरू असताना पीडितेचा 5 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घाटीमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 302 समाविष्ट करण्यात आले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी काम पाहिले. 

हे वाचलंत का?- निकम साहेब... हे जेवण मीच बनवलेय ना! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gas cylinder blast in truck Tuljapur, Osamanabad