दोन लाख गॅसधारकांचे रॉकेल केले बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

बीड तालुक्‍यातील ५९ हजार गॅसधारकांचा समावेश

बीड - शासनाच्या निर्देशानुसार दोन गॅस सिलिंडर असणाऱ्या कार्डधारकांचे रॉकेल नियतन यापूर्वीच पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एक गॅस असणाऱ्या ग्राहकांचेदेखील रॉकेल नियतन बंद करण्याचे शासनाने निर्देश दिले. यानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ६४८ शिधापत्रिका असणाऱ्या गॅसधारकांचे रॉकेल नियतन बंद करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्याचा रॉकेल कोटा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामध्ये बीड तालुक्‍यातील सर्वाधिक ५९ हजार गॅसधारकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. 

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या ७ लाख ८ हजार ५३३ इतकी आहे. शासनाने सुरवातीला बोगस शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम राबविली. अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावे रॉकेल तसेच धान्य उचलले जात असल्याने शासनाने यानंतर रेशनकार्डधारकांचे आधारक्रमांक मागवून ते शिधापत्रिकेशी लिंकींग करण्याची मोहीम हाती घेतली. यामुळे बोगस शिधापत्रिकाधारकांची संख्या समोर येणार आहे. याशिवाय रॉकेल कोटा नियंत्रित करण्यासाठी शासनाने दोन गॅसधारक तसेच त्यानंतर एक गॅसधारक यांची माहिती मागवून गॅस उपलब्ध असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल नियतन बंद करण्याची कारवाई हाती घेतली. यानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत एक गॅस सिलेंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख ५३ हजार ९५५ तर दोन सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकांधारकांची संख्या ५४ हजार ६९३ इतकी आहे. या सर्व गॅसधारकांचे रॉकेल बंद करण्यात आले असून त्यानुसार त्यांच्या हिश्‍श्‍याचे रॉकेल कमी करून शासनाकडे आवश्‍यक कार्डधारकांपुरत्याच रॉकेल कोट्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.
 
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गॅस असलेल्या शिधापत्रिकाधारकांचा आढावा घेऊन त्यांचे रॉकेल नियतन बंद करण्यात आले आहे. जवळपास २ लाखांवर गॅसधारकांचे रॉकेल बंद करण्यात आलेले असून आता उर्वरित पाच लाख कार्डधारकांना पुरेल एवढ्याच रॉकेल कोट्याची शासनाकडे मागणी करण्यात येते. आता पुरवठा विभागाने गॅस एजन्सीलाच नवीन गॅसग्राहकांची माहिती पुरवठा विभागाला कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- संतोष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: gas holder kerosene close