दुषित पाण्यामुळे नांदगावच्या ६० ग्रामस्थांना गॅस्ट्रो 

devgaon
devgaon

देवगावफाटा : एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दुसरीकडे सेलू तालुक्यातील नांदगाव येथे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले आहे. याठिकाणी सुमारे ६० नागरिकांना याची तीव्र लागण झाली आहे. साथीची माहिती मिळताच वैद्यकीय पथक दाखल झाले असून, प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर गावातच सामुदायिकरित्या उपचार केले जात आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून नांदगाव येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना खासगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. 

गावात भीतीचे वातावरण 
गेल्या दोन दिवसांपासून गावातील काहींना मळमळ, पोटदुखी, उलटी, जुलाबचा त्रास सुरू झाला. यामध्ये काही लहान मुले, वयोवृद्ध, महिलांचा समावेश आहे. सुरवातीला यातील काहींनी उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली. परंतू, रूग्णांची संख्या थांबायचे नाव न घेता वाढू लागल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती आरोग्य विभागाला मिळताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विष्णू मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी रावजी सोनुने, श्री. वाटुडे, आरोग्य सेविका तारू, कप्पे यांचे वैद्यकीय पथक नांदगाव येथे दाखल झाले असून प्रत्येक रुग्णांवर गावातच सामुदायिकरित्या उपचार सुरू आहेत. 

परभणीत कोरोनाने एकाचा मृत्यू. ५४ बाधित  
परभणी ः जिल्ह्यात आज ५४ कोरोनाबाधित आढळले. एकूण रुग्णसंख्या पाच हजार ७९८ झाली असून चार हजार ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या २४१ झाली आहे. तसेच परभणी महापालिकेने मंगळवारी (ता.सहा) शहरातील चार केंद्र व सात खासगी रुग्णालयात ५४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात केली. त्यामध्ये फक्त दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. 


सध्या साथ आटोक्यात आली 
दुषित पाणी पिल्यानेच नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व थंड करून प्यावे. सध्या साथ आटोक्यात आली असून वैद्यकीय पथक गावात ठाण मांडून आहे. 
- रावजी सोनवने, तालुका आरोग्य अधिकारी, सेलू.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com