

कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात अपघातातील जखमींवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. रुक्सार खान व कर्मचारी.
Sakal
कन्नड : पुणे-बारामती येथील साखर कारखान्याचा हंगाम संपवून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आयशर टेम्पोला गौताळा घाटात भीषण अपघात झाला. घाटातील म्हसोबा मंदिरा जवळील वळणावर टेम्पोचे ब्रेक अचानक फेल झाल्याने गाडी दरीत उलटली. या अपघातात सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील १३ मजूर जखमी झाले असून, त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.