युवकाच्या व्यवसायाला जर्मन टेक्नॉलॉजीमुळे उभारी

Nanded News
Nanded News

नांदेड : उच्च शिक्षण घेऊन आज अनेकजण नोकरीच्या शोधात भटकंती करत आहेत. त्यात काहींना नोकरी मिळते, काहींना मिळत नाही. परिणामी नैराश्य येऊन व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी करतात. मात्र, ज्यांच्याकडे इच्छा आहे, कल्पकता आहे ते नोकरीच्या मागे न धावता आपला वेगळा मार्ग धुंडतात. त्यात ते यशस्वी होतात. म्हणतात ना की, इच्छा तेथे मार्ग असतो. याला प्रत्यक्षात उतरवले आहे बाचोटी (ता.कंधार) येथील बीएस्सी झालेल्या रणधीर बचोटीकर या युवकाने.

किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करणारे रणधीर यांना समाजसेवेची लहानपणापासूनच आवड आहे. दुकान सांभाळून त्यांनी शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. सोबतच समाजसेवाही केली. ग्रामीण भागासह शहरी भागांतही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. परिणामी डेंगीसारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांनी २०१० मध्ये गाडगेबाबा ग्रामीण विकास सेवाभावी संस्था सुरु केली. त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. 

जर्मन टेक्नॉलॉजीचा अवलंब
सोबतच रणधीर यांनी विकास हायजीन टॅंक क्लिन हा व्यवसाय सुरु केला. यासाठी जर्मन टेक्नॉलॉजीचा अवलंब करण्यात येत आहे. शहरातील मोठे हाॅटेल्स, रुग्णालये, गृहनिर्माण सोसायट्या, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी असलेल्या पाण्याच्या पीव्हीसी, आरसीसीच्या टाक्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या साह्याने क्लिन करण्याचे काम ते करत आहेत. सोबतच डस्टचेही काम ते या मशिनद्वारे करतात.

अशी आहे जर्मन टेक्नॉलॉजी

स्लज पंप या मशिनच्या साह्याने पाण्याचा टाकितील सर्व गाळ व घाण पाणी काढले जाते. त्यानंतर पाण्याच्या उच्च दाबाच्या फवाऱ्याने टाकीचे छत, भिंती, कोपरे, तळ व झाकण स्वच्छ धुवून घेतले जाते. थोड्यावेळानंतर पुन्हा एकदा उच्च दाबाच्या पाण्याच्या फवाऱ्याने टाकीच्या भिंती व तळ धूवून घेतात. शिल्लक राहिलेले सर्व पाणी काढून संपूर्ण टाकी शेवटच्या थेंबापर्यंत कोरडी केली जाते. नंतर हर्बल रसायनची फवारणी केली जाते. पाण्याची स्वच्छ व कोरडी केल्यानंतर अल्ट्रा व्हायोलेट स्टरलायझररद्वारे टाकी निर्जंतूक केली जाते.

हायप्रेशर वाॅटरजेट क्लिनिंग मशिन

स्वच्छता आज मानवाची मूलभूत गरज बनली आहे. घाणीमुळे मलेरिया, डायरिया, कावीळ आदी आरोग्याचे हानी करणारे अनेक रोग होतात. प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते.  टाकीतील तसेच बाहेर साठून असलेला गाळ, शेवाळ, जंतू, क्षार काढण्यासाठी जेथे टाकीच्या कानाकोपऱ्यात ब्रश, काथ्या पोहचत नाही तेथे जर्मन तंत्रज्ञान हायप्रेशर वाॅटरजेट क्लिनिंग मशिन काम करते.

आजाराचे मूळ कारणच पाणी आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना निरोगी जीवन जगता यावे म्हणून मी या व्यवसायाकडे वळलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान सध्या सुरु आहे. परंतु, हे अभियान मी २०११ पासूनच राबवत आहे. भविष्यात शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे जर्मन टेक्नॉलॉजीच्या साह्याने स्वच्छ करण्याचा मानस आहे. तसेच भूमिहीन शेतकरी आणि बहुजन समाज या पुस्तकाचेही लेखन सुरु आहे. पाणीच आजाराचे मूळ कारण
- रणधीर बाचोटीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com