Jalna News: इंधनाअभावी वाहनधारकांचे हाल; शेती कामांवरही परिणाम; जिल्हा पुरवठा विभागाकडून तहसीलदारांना काळाबाजार रोखण्याचे आदेश

Ghansavangi Faces Petrol and Diesel Shortage: घनसावंगी तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनधारक अडचणीत आहेत. काही पंप बंद असल्यामुळे रांगा लांबून पसरल्या आहेत.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

​घनसावंगी: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये विस्कळितपणा निर्माण झाला आहे. यामुळे घनसावंगी तालुक्यातील काही पंप बंद असल्याचे चित्र आहे. पंप बंद असल्याच्या फलकांमुळे वाहनधारकांना इंधनासाठी वणवण करावी लागत असून, मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी नम्रता साठे यांनी याप्रकरणी सर्व तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.इंधन कंपन्यांकडून होणारा पुरवठा संथगतीने होत असल्याने अनेक पंपांवरील साठा संपला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com