नगरपंचायतीस स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीमेत घनसावंगी, थ्री स्टारचाही देशात 13 वा क्रंमाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

नगरपंचायतीस स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीमेत घनसावंगी, थ्री स्टारचाही देशात 13 वा क्रंमाक

घनसावंगी : स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत घनसावंगी नगर पंचायतीस स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 25000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमधून घनसावंगी नगर पंचायतीस देशात 13 क्रंमाकाचे मानांकन प्राप्त झालेले आहे. यामध्ये कचरा मुक्त शहर, हागणदारी मुक्त शहर, तसेच घनसावंगी व्यवस्था पण इत्यादी बाबींचा समावेश होता .

तसेच घनसावंगी शहराने थ्री स्टार चा पण बहुमान मिळाला. सदर बहुमान राष्ट्रपती रामनाथ कोंवींद यांच्या हस्ते प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस , नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी हा बहुमान बहाल करण्यात आला आहे. सदर बहुमानांसाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगर पंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा योजनाताई देशमुख, दुसर्‍या नगराध्यक्षा प्राजक्ताताई देशमुख, तसेच उपनगराध्यक्ष राधेश्याम धाईत, सलीमा बी सय्यद गफूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक नंदकुमार देशमुख,

हेही वाचा: औरंगाबाद : सय्यद मतीन राष्ट्रवादीतूनही निलंबित

मिराताई देशमुख, खान मुजाहेद खुर्शीद अली, अ‍ॅड राजेश्वर देशमुख, फैयाज खा गुलशेरखा पठाण, गणेश हिवाळे, चंद्रकलाबाई चव्हाण, कविता पवार, बाबासाहेब सोमवारे, यशोदाबाई राठोड, अंजना कथले, लताताई हिवाळे, विलास गायकवाड, आवेज खान पठाण, शेख जाकेर तसेच नगर पंचायत मधील सर्व कर्मचारी यांनी या उपक्रमात सहकार्य केले त्यामुळे हा बहुमान मिळाला असल्याचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी सांगीतीले.

loading image
go to top