निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, घनसावंगी तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीची रणधुमाळी

ghansavangi gram panchayat election
ghansavangi gram panchayat election

घनसावंगी (जि.जालना) : तालुक्‍यात ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. तहसील कार्यालयाचा निवडणूक विभाग नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापासून विविध प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिली.

 घनसावंगी तालुक्‍यात ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यात बोधलापुरी, बोररांजणी, बोरगाव खुर्द, चित्रवडगाव, देवीदहेगाव, देवडीहादगाव, देवहिवरा, ढाकेफळ, घोन्सी बुद्रूक, घोन्सी तांडा एक व दोन, घोन्सी खुर्द, गुंज बुद्रूक, गुरूपिंपरी, जांबसमर्थ, जिरडगाव, जोगलादेवी, कंडारी अंबड, कंडारी परतूर, खडका, करडगाव, खडकावाडी, खालापुरी, खापरदेवहिवरा, कोठी, कृष्णापूरवाडी, लिंबोनी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, माहेरजवळा, मांदळा, मंगरूळ, मासेगाव, मुद्रेगाव, मुरमा खुर्द, नागोबाची वाडी, अंतरवाली टेंभी, अंतरवाली दाई, अव्वलगाव बुद्रूक, बाचेगाव, बहिरेगाव, भायगव्हाण, भुतेगाव, बोडखा बुद्रूक, निपाणी पिंपळगाव, पाडुळी बुद्रूक, पानेवाडी, पारडगाव, राहेरा, राजाटाकळी, राजेगाव, रामसगाव, रांजणी, रांजणीवाडी, रवना, साकळगाव, सरफगव्हाण, शेवगळ, शिंदेवडगाव, सिंदखेड, तीर्थपुरी, यावलपिंपरी, यावलपिंपरीतांडा, येवला या 62 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतीमधून 203 प्रभागात 548 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यात अनुसूचित जातीचा प्रवर्गात महिला 22 पुरुष 51 असे एकूण 73, अनुसूचित जमाती प्रवर्गात महिला पाच , इतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गात 74  महिला, 67 पुरूष असे एकूण 141 , सर्वसाधारण प्रवर्गात 209 महिला , 120 पुरुष असे एकूण 329 जागांचा समावेश आहे.

याप्रमाणे 50 टक्के महिलासह जागा असणार आहे. त्यासाठी 56 हजार  205 पुरुष व 52 हजार 318 महिला असे एकूण 1 लाख 8 हजार 503 मतदारांचा समावेश आहे. नामनिद्रेशनपत्र दाखल करण्यासाठी 24 निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मदत करण्यासाठी 24 सहायक निवडणूक निर्णय आधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन निवडणूक निर्णय अधिकारी व दोन सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची राखीव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी 205 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी क्रमांक एक, क्रंमाक दोन मतदान केंद्राध्यक्ष असे एकूण अंदाजे 600 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दोन वेळा निवडणूक  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीतेसाठी  निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संदीप मोरे, गौरव खैरनार , संदीप सपकाळ,  सुशील जाधव, एम.एन. भोजने,नेताजी भोजणे, आर.बी.माळी,  श्री .पेरके, श्री. आरगडे,  राजेश भोसले, विठ्ठल कथले यांच्यासह इतर कर्मचारी पुढाकार घेत आहे

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com