esakal | Rain Update: घनसावंगी तालुक्यात पावसाचा जोर कायम
sakal

बोलून बातमी शोधा

ghansavangi

सततच्या पावसामुळे दिवसभर सूर्यदर्शनही होत नाही. या पावसामुळे ग्रामीण भागात रोगराईचे प्रमाण वाढले आहे

Rain Update: घनसावंगी तालुक्यात पावसाचा जोर कायम

sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी (जालना): घनसावंगी तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर सर्वच रस्त्यांची वाताहत झाल्याने वाहतूकीत अडथळा होण्याबरोबर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. घनसावंगी तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार व जोरदार पावसाचा जोर काही केल्या कमी होत नसल्याने खरिपांची सर्वच पिके पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर पाऊस उघडण्याची चिन्हे नसल्याने तसेच पाऊस उघडल्यास अजून पंधरा दिवस वापसा होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर या पिकांना कोणतीही उपाययोजना करणे शक्य नसल्याने यंदाचा खरिप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सततच्या पावसामुळे दिवसभर सूर्यदर्शनही होत नाही. या पावसामुळे ग्रामीण भागात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. तसेच  पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. घनसावंगी ते कुंभारपिंपळगाव या रस्त्यांचे काम सुरू असल्याने या रस्त्यांच्या अनेक ठिकाणी पूलाचे काम सुरू आहे. जवळपास गेल्या दोन वर्षापासून संथगतीने चालणाऱ्या कामामुळे मोठ्या प्रमाणांवर नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यात ढालसखेडा व ताडहादगाव येथील पुलाच्या बाजूने करण्यात आलेला मातीचा भराव वाहून जाण्याचा प्रकार वाढल्याने नागरिकांना घनसावंगीकडे येण्यास अंबड, राणीउचेंगाव मार्गी घनसावंगी यावे लागत आहे.

हेही वाचा: केंद्रेवाडीत गुढ आवाजाने भीतीचे वातावरण; नागरिकांनी काढली रात्र जागून

अशाच प्रकारे राजेगाव गाव लगत पूल, देवडीहादगाव येथील पूल, रांजणी रस्त्यांवर येवला तलावाजवळील रस्ता, तिर्थपुरी ते मुरमा खुर्द रस्त्यांवर पूल यावरून पावसाचे पाणी वाहत राहील्याने वाहतूकीत अडथळा निर्माण झाला यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाबरोबर पुूलाची उंची वाढवून आगामी पावसाळ्यात निर्माण होणारा अडथळा दुर करता येईल असी मागणी जोर धरीत आहे.

loading image
go to top