घाटीची हॉस्पिटल सपोर्ट सिस्टीम केवळ नावापुरती 

hospital
hospital

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) कारभारात सुसूत्रता व समन्वय आणण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी गाजावाजा करून वर्षभरापूर्वी सुरू केलेली हॉस्पिटल सपोर्ट सिस्टीम (एचएसएस) केवळ नावापुरती उरली आहे. एचएसएस पथकातील सदस्यांना सुविधांचा अभाव व सूचनांकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे चित्र निर्माण झाले. 

घाटीत दररोज रात्री अपघात, ट्रॉमा, ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, एमआयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू, आयसीसीयूसह वॉर्डातील अडीअडचणी व कारभारावर लक्ष ठेवणे व अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालयासह क्‍लिनिकल प्राध्यापक, सहायक व सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. त्यासाठी 151 लोकांचा एक व्हॉट्‌सऍप ग्रुप 24 ऑगस्टला सुरू झाला. पाच डॉक्‍टरांच्या टीमने रात्री आठ ते सकाळी आठदरम्यान सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन उद्‌भवलेल्या समस्या व पूर्ततेसाठी आवश्‍यकता याचा रिपोर्ट त्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर करण्याची प्रथा पडली. दररोजच्या दिलेल्या अहवालाचे पुढे काहीच होत नसल्याने ही केवळ एक अनौपचारिकता असलेली सिस्टीम ठरली. दररोज ठराविक ठिकाणीच ही एचएचएस टीम जात असल्याने इतर समस्यांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर डॉक्‍टरांना रात्री राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने ही योजना बारगळल्याचाही एका गटाचा सूर आहे. शिवाय महिला डॉक्‍टरांच्या समस्या आहेत; मात्र प्रशासन दिलेल्या सूचनांवर कोणतेही ठोस उपाय होत नसल्याने या एचएसएस टीमच्या सदस्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. 

एचएसएसमुळे घाटीतील वाद व नातेवाइकांची ओरड कमी होण्यास मदत झाली आहे. यावर्षीचे नवे शैक्षणिक वेळापत्रक बनल्याने प्री व पॅरा-मेडिकल स्टाफच्या अनेक डॉक्‍टरांनी हे राउंड बंद करण्याची मागणी केली; मात्र एचएसएसमुळे रात्रीच्या कारभारावर वचक आहे. नसल्यापेक्षा असलेली यंत्रणा उपयोगी ठरत आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com