जिराफ येणार... टांझानियाहून नव्हे तर म्हैसूरहून! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने टांझानियातून जिराफाची जोडी आणण्यास परवानगी दिली नसल्याने आता जिराफाची जोडी म्हैसूर येथून आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय आणि सिडकोतील नियोजित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील उद्यानात दोन ठिकाणी जिराफ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र म्हैसूरहून एकच जोडी मिळणे शक्‍य असल्याने एकाच ठिकाणी जिराफ पाहायला मिळणार आहेत.

 सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जिराफ नसल्याने व्यवस्थापनाकडून जिराफाची जोडी आणण्याचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जिराफांच्या अधिवास, आजार, त्यांचे खाद्य यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी उपायुक्‍त अय्युब खान, प्राणिसंग्रहालय संचालक विजय पाटील व एम. बी. काजी हे तिघे हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे जाऊन आले. मात्र देशभरातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयातून त्यावेळी जिराफाची जोडी मिळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे टांझानिया येथून जिराफ आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा प्रवास खर्चिक आणि त्याबदल्यात प्राण्यांची अदलाबदल करण्याची अट होती. अदलाबदल करण्यासाठी प्राणी  उपलब्ध नाही आणि वन्यप्राण्यांची खरेदी विक्री करता येत नाही. त्यातच मुंबईमध्ये पेंग्विन मरण पावल्याच्या घटनेपासून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परदेशी प्राणी, पक्षांच्या आणण्यावर प्रतिबंध घातले असल्याने जिराफ आणण्यासाठी परवानगी दिली नाही. यामुळे टांझानियातून जिराफ आणण्याचा विचार रद्द करण्यात आला आहे. आता म्हैसूर येथून जिराफाची एक जोडी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. तिथे सध्या सात जिराफ असून, त्यात नवजात पिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Giraffe will come