टेम्पोच्या धडकेत युवती ठार

बाबासाहेब गोंटे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

अंबड (जि. जालना) : येथील लालवाडीतांडा येथील पायल विलास चव्हाण (वय 15) ही तांडयातुन पारनेर पेट्रोल पंपावर किराणा सामान भरून स्कुटीवरुन  लालवाडी तांडयाकडे शुक्रवारी (ता. 5) सकाळी साडेनऊ वाजता जात असताना पाठीमागुन जालना शहराकडे जाणाऱ्या टाटा 407 टेम्पोने जोराची धडक दिल्याने स्कुटीवरील पायल ही अपघातात जागीच गातप्राण झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लालवाडीतांड़ा येथील पायाल चव्हाण ही अंबड शहरातील मत्स्पोदरी विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकत होती. सध्या वार्षिक परीक्षा सुरु असल्याने शुक्रवारी (ता. 5) सकाळी नऊ वाजता किराणा सामान भरण्यासाठी पारनेर पेट्रोलपंपावर स्कुटीवरुन आली होती. साडेनऊ वाजेच्या दरम्यान किराणा सामान घरी ठेवून अंबड शहरात पायल पेपर देण्यासाठी येणार होती. मात्र रस्त्यातच दुर्देवी घटना होऊन पायल अपघातात जागीच ठार झाली. या घटनेची माहिती परीसरात वाऱ्यासारखी पसरली.शेकडो नागरीक जमा झाले. या घटनेची माहिती पोलीसांना कळविल्यानंतर पोलिस उशिरा घटनास्थळावर पोहचले. मात्र रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहचली.नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

पायल हिला एक भाऊ व एक बहिण आहे. परीक्षेसाठी छोटी बहिण सेजल ही शहरातील दत्ताजी भाले शाळेत इयत्ता सातवीमध्ये असुन तिची परीक्षा सुरु असल्याने तिलापण स्कुटीवरुन घेऊन येणार होती. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त कऱव्यात येत आहे.

Web Title: a girl die due to accident