आर्थिक अडचणींमुळे युवतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

शिराढोण - उच्चशिक्षणात येणाऱ्या आर्थिक अडचणींतून आलेल्या नैराश्‍यातून युवतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास पिंपरी (शि., ता. कळंब) येथे घडली.

शिराढोण - उच्चशिक्षणात येणाऱ्या आर्थिक अडचणींतून आलेल्या नैराश्‍यातून युवतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास पिंपरी (शि., ता. कळंब) येथे घडली.

प्रगती अविनाश राऊत (वय २०) असे मृत युवतीचे नाव आहे. तिने घरात ओढणीने गळफास घेतला. अविनाश राजेंद्र राऊत यांच्याकडे एक एकर जमीन आहे. पत्नी, दोन मुली व मुलासह ते राहतात. त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झाला, तर मुलगा दहावीत शिक्षण घेत आहे. प्रगती मुरूड (ता. लातूर) येथील संभाजी महाविद्यालयात बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत विविध स्पर्धा परीक्षा देत होती. तिला रेल्वे बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मुंबईला जायचे होते. तिच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी फायनान्सकडे कर्जासाठी अर्ज केला होता.

शनिवारी सकाळी ‘तू कॉलेजला जा, आम्ही आज पैसे घेऊन येतो’, असे सांगून ते दोघे कळंबला गेले होते. रात्री फायनान्सचे ६० हजार रुपये घेऊन घरी परतले असता घर आतून बंद होते. प्रगतीने आत्महत्या केली होती. शिराढोण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Girl Pragati Raut Suicide