छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

सिल्लोड - दररोजच्या छेडछाडीला कंटाळून उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील अल्पवयीन विद्यार्थिनीने सोमवारी (ता. चार) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीचे वडील कृष्णा जाधव यांनी अजिंठा पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी संजय घुगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंडणगाव येथील प्रणाली जाधव ही पालोद येथील यशवंत महाविद्यालयात दररोज बसने शिक्षणासाठी जात असे. सिल्लोड येथील रामकृष्ण विद्यालयात लिपिक असलेला संजय घुगरे, रा. घटांब्री हा कर्मचारी तिची छेडछाड करीत होता. मी म्हणेल तसे एैक, अन्यथा माझ्याकडे असलेली तुझी छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी व तुझ्या कुटुंबाची बदनामी करील, अशी धमकी विद्यार्थिनीस देत होता. याबाबत तिने तिच्या पालकांनाही सांगितले होते. त्यानंतर पालकांनी संजय घुगरे यास समजावून सांगितले होते. तरीही त्याने विद्यार्थिनीची छेडछाड बंद केली नाही. बारावीत शिकत असलेली प्रणाली सोमवारी महाविद्यालयातील निरोप समारंभाच्या कार्यक्रमास गेली असता संशयित आरोपीही त्याठिकाणी गेला. त्याने विद्यार्थिनीस बदनामीची धमकी दिल्याने महाविद्यालयातून घरी येताच प्रणालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आरोपीस अटक केल्यानंतरच विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Girl Student Suicide by Tampering Crime