माजलगावात तरुणीची जाळून घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

तरुणीने घरात कोणी नसताना जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 22) शहरातील दत्त कॉलनी भागात घडली. स्वाती सुधाकर नाईकनवरे (वय 22) असे या तरुणीचे नाव आहे. 

माजलगांव (बीड) : तरुणीने घरात कोणी नसताना जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 22) शहरातील दत्त कॉलनी भागात घडली. स्वाती सुधाकर नाईकनवरे (वय 22) असे या तरुणीचे नाव आहे. 

शिक्षक सुधाकर नाईकनवरे यांची मुलगी स्वाती शनिवारी एकटीच घरी होती. दुपारी साडेबारा वाजता घरामध्ये कोणीही नसताना तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये जळून तीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन पंचनामा सुरू आहे. दरम्यान या तरूणीने जाळून घेतल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Web Title: a girl suicide in majalgao