मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

लातूर - येथील अंबाजोगाई रस्त्यावरील त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयात उडी मारलेल्या मुलीचा गुरुवारी (ता. 19) मृत्यू झाला. याप्रकरणी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून संस्थाचालकासह चौघांवर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

लातूर - येथील अंबाजोगाई रस्त्यावरील त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयात उडी मारलेल्या मुलीचा गुरुवारी (ता. 19) मृत्यू झाला. याप्रकरणी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून संस्थाचालकासह चौघांवर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

वडगाव (ता. हातकणंगले) येथील निलोफर मुबारक बारगीर ही मुलगी येथील अंबाजोगाई रस्त्यावरील सदरील महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. या मुलीने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारली होती. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचे वडील मुबारक बारगीर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की गेल्या दिवाळीच्या सुटीत निलोफर गावाकडे आल्यानंतर ऋतुराज यादव नावाच्या मुलाने फोन करून तुमच्या मुलीवर मी प्रेम करीत आहे, असे सांगितले. त्या वेळी माझ्या मुलीपासून दूर राहा, पुन्हा फोन करू नको म्हणून मी त्याला सांगितले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये महाविद्यालयातून शहाजी नावाच्या शिक्षकाने मला फोन करून तुमच्या मुलीने नस कापून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही येथे येऊन मुलीची रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी ऋतुराज यादव याच्या कृत्यामुळे तणावातून मी नस कापून घेतल्याचे सांगितले होते. त्या वेळी संस्थाचालकाचा मुलगा ओंकार होनराव यांच्याशी मी संपर्क साधला. तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षीत राहील, असे त्यांनी सांगितले. तसे मी त्यांना लिहून दिले, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

दोन दिवसांपूर्वी पुन्हा माझ्या मुलीकडून संस्थेच्या दोन-तीन कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून काही तरी लिहून घेतले. संस्थाचालकांच्या सांगण्यावरून हा प्रकार झाला आहे. बळजबरीने काही तरी लिहून घेणे व ऋतुराज यादव याने फूस लावून माझ्या मुलीला त्रास दिला. यातून मानसिक तणावातून मुलीने इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या केली. सदरील तक्रारीवरून संस्थाचालक उमाकांत होनराव, ओंकार होनराव, ऋतुराज यादव व शहाजी कांबळे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायंकाळी या मुलीचा मृतदेह तिच्या गावाकडे नेण्यात आला. 

Web Title: girls suicide case four people have filed a crime

टॅग्स