मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या : सु. ग. जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कवी अटलबिहारी साहित्यनगरी (उदगीर) : मराठी ही हजारो वर्षांपूर्वीची भाषा असूनही अद्याप या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. तो मिळणे गरजेचे अाहे. त्यासाठी राजकारणी, साहित्यिक, संस्कृती संवर्धक आणि समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ इतिहास संशोधक सु. ग. जोशी यांनी सोमवारी व्यक्त केले.

मराठवाडा साहित्य परिषद आणि परिषदेच्या उदगीर शाखेच्या वतीने आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (ता. २४) जोशी यांच्यासह ज्येष्ठ अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार या ज्ञानतपस्वींचा विशेष सन्मान करण्यात अाला. स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, बस्वराज पाटील नागराळकर, बापू राठोड या वेळी उपस्थित होते. 

जोशी म्हणाले, राष्ट्रकुट व यादवांच्या इतिहासात लातुरच्या समृद्ध संस्कृतीचा मोठा उल्लेख आहे. चौथ्या व पाचव्या शतकातील कन्नड शिलालेखात लातुरचे अनेक संदर्भ आढळतात. मराठीवर प्रारंभापासून आजपर्यंत कन्नड भाषेचा मोठा प्रभाव आहे. अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र, मराठीला अद्यापपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला नाही. तो दर्जा मिळणे गरजेचे आहे. मराठीपेक्षा कमी इतिहास व संस्कृती असलेल्या काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र मराठीची गळचेपी अद्याप सुरुच अाहे.’’ मराठीमध्ये अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, त्याचा वापर आजच्या भाषा समृद्धतेसाठी होणे गरजेचे आहे. संदर्भग्रंथाचा वापर लोणच्यासारखा झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Give Marathi the status of classical language says S G Joshi