esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात तपासणार प्रत्येकाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी
sakal

बोलून बातमी शोधा

Give Pulse Oximeters to All Village in Osmanabad District

जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती

उस्मानाबाद जिल्ह्यात तपासणार प्रत्येकाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोना संसर्ग ओळखण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गावस्तरावर ऑक्सिमीटर पोचवून प्रत्येकाची ऑक्सिजन तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी ‘सकाळ’ला दिली. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून रोज १० ते २० रुग्णांची वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात ३३१ कोरोनाबाधित झालेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. शेजारील लातूर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, तेथील संसर्ग वाढू लागला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नागरिकांचा
लातूर, सोलापूर आणि बार्शी येथील आरोग्यसेवेवर अवलंबून असतो. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक नागरिक दवाखान्यानिमित्त शेजारील जिल्ह्यात जातात. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. उमरगा, तुळजापूर, परंडा, भूम आणि कळंब तालुक्यांत संसर्गाचा आलेख वाढत आहे. त्यासाठी ऑक्सिमीटरद्वारे प्राथमिक चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतला आहे. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  
  
गावागावांत ऑक्सिमीटर 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्त्या प्रत्येक गावात आहेत. शिवाय त्यांना साहाय्य करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती गावात काम करतात. आशा कार्यकर्तीकडे ऑक्सिमीटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

लक्षणे जाणवू लागली अथवा लक्षणे नसली तरी प्रत्येकाची ऑक्सिमीटरने तपासणी केली जाणार आहे. जर एखाद्या नागरिकाच्या शरीरात ९० टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन असेल तर त्याची तत्काळ तपासणी करावी लागणार आहे. संबंधित नागरिकाला तत्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन पुढील तपासणी करणे अपेक्षित आहे. ऑक्सिमीटर हाताळण्यासाठी अगदी सोपे आहे. काही मिनिटांतच दोन-तीन व्यक्तींची तपासणी पूर्ण होऊ शकते. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक  
 

जर ऑॅक्सिजन ९० पेक्षा कमी येत असेल तर तपासणी करून घ्यावी. सध्याच्या साथीच्या रोगात प्रत्येकाने ऑक्सिजनचे प्रमाण पाहिले पाहिजे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात यासंदर्भातील सेवा उपलब्ध आहेत. कोरोनाचा संसर्ग पहिल्या टप्प्यात पाहिल्यास गावातील संसर्गावर नियंत्रण ठेवता येते. 
- राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक, उस्मानाबाद. 

 

                                                             (संपादन : विकास देशमुख) 
 

loading image