esakal | महाजन-मुंडे यांचा पदवीधरचा गड अबाधित राखा, संभाजी पाटील निलंगेकर यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

31sambhaji_patil_nilangekar

आताही या मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करुन हा गड आबाधीत राखावा, असे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

महाजन-मुंडे यांचा पदवीधरचा गड अबाधित राखा, संभाजी पाटील निलंगेकर यांचे आवाहन

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : दिवंगत गोपीनाथ मुंडे व दिवंगत प्रमोद महाजन यांनी मराठवाडा मतदार संघाची बांधणी करुन दोन वेळा येथून उमेदवार विजयी केले. आताही या मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करुन हा गड आबाधीत राखावा, असे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. मुंडे यांचे नाव वापरून संभ्रम निर्माण केला जात आहे. याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आष्टीत जप्त केलेल्या बोट घेऊन वाळूमाफियांचा पोबारा! 


शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (ता. १९) झाली. प्रदेश उपाध्यक्षा खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आमदार लक्ष्मण पवार, आदिनाथ नवले, रमेशराव आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, केशवराव आंधळे, सर्जेराव तांदळे, विजयकुमार पालसिंघनकर, नवनाथ शिराळे, नीळकंठ चाटे, अशोक लोढा, भारत काळे, विजयकांत मुंडे, रामराव खेडकर, सुलोचना वाव्हळ, प्रकाश कवटेकर, जयदत्त धस, अजय धोंडे, प्रा.चंद्रकांत मुळे, प्रा. नितीन कुलकर्णी, वाल्मिक निकाळजे, अजय सवाई, राजेंद्र बांगर, प्रा. देविदास नागरगोजे, सुधीर घुमरे, शिवाजी मायकर, दादासाहेब गिरी, शंकर देशमुख, मधुकर गर्जे, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, चंद्रकांत फड, मीरा गांधले, संगीता धसे, चंपाताई पानसंबळ, सुभाष धस आदींची उपस्थिती होती.

Edited - Ganesh Pitekar