मनोरूग्णांना घातली अंघोळ, केली कटींग दिले नवे कपडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या अनेक मनोरूग्णांची स्वच्छता करून विविध रोगांपासून त्यांचा बचाव करण्यात येत आहे.

नांदेड : देशात सर्वत्र कोरोनाची दहशत पसरली असताना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जोपासात शहरातील मनोरूग्णांचा शोध घेऊन त्यांना अंघोळ घालून त्यांचे वाढलेले केस कापले. मनोरूग्णांना स्वच्छ करून कोरोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

डॉ. मोहन चव्हाण यांनी यापुर्वी गणेशोत्सवानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्रांना बंदोबस्ताच्या ठिकाणी जेवणाचा डब्बा, तसेच हिवाळ्यामध्ये कडाक्याचे थंडीत मनोरूग्ण व बेवारस नागरिकांना बँल्केट वाटप करून ते आपले सामाजिक कार्य बजावतात. तर दिपावळीला बेघरांना कपडे, अनाथ आश्रमामध्ये जावून फळ वाटप करून ते आपली दिवाळी साजरी करतात. आज देशभरात कोरोनासारख्या विषाणूचा फैलाव होत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा कोरोना व्हायरस : परभणीतील युनियन बॅंकेचे 10 कर्मचारी निगराणीखाली

मनोरूग्णांना अंघोळ घालून त्यांना स्वच्छ केले

नागरिकांना वेगवेगळ्या सुचना केल्या जात आहेत. मात्र प्रशासनाने समाजापासून दूर असलेल्या मनोरूग्णांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी डॉ. मोहन चव्हाण यांनी पुढाकार घेतला. शनिवारी (ता. २१) मार्च रोजी नांदेड रेल्वे स्थानकात असलेल्या मनोरूग्णांचा शोध घेऊन मनोरूग्णांना स्वतः अंघोळ घालून त्यांना स्वच्छ केले. व मनोरूग्णांचे वाढलेेले केसही कापले. त्यानंतर मनोरूग्णांना नवीन कपडे देण्यात आले. नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या अनेक मनोरूग्णांची स्वच्छता करून विविध रोगांपासून त्यांचा बचाव केला आहे. 

राष्ट्रीय बंजारा परिषदेचे डॉ. मोहन चव्हाणांचा पुढाकार

शिवाय इतरांनाही त्यांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी डॉ. चव्हाण यांनी घेत मनोरूग्णांना सॅनिटायझर वाटप केले. त्यांच्या हा साामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्रविण चव्हाण, शिवाजी चव्हाण, प्रा. एन. जी. राठोड, प्रल्हाद राठोड, राजू राठोड, गणेश जाधव, नकुल चव्हाण, लकुश जाधव, राज गंगोत्री, नामदेव गंगोत्री, शंकर सोनटक्के, शिवाजी गायकवाड, कुणाल कदम, प्रशांत अहीर, कुणाल चालीकवार, अमोल डोणेराव, पंकज सावंत, प्रफुल्ल अंबोरे, दत्ता चापलकर, महेश पाटील, मनोज गरळ, वसंत सवई, मनोज राठोड आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Giving baths cutting and new clothes nanded news